कोल्हापूर:कोल्हापूरच्या जनतेने महापालिकेची सत्ता मोठ्या विश्वासाने महायुतीकडे सोपवली आहे. जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. निवडणूक काळात जाहीर झालेल्या वचननाम्याची पूर्तता करण्याचा महायुतीचा नक्कीच प्रयत्न असेल. कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या सर्व कोल्हापूरकरांचे, भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते – पदाधिकारी यांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित दादा पवार तसेच चंद्रकांत दादा पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच महायुतीच्या विजयासाठी शिवसेनेचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे आमदार हसन शरीफ यांनीही प्रचंड मेहनत घेतली. महायुतीच्या एकत्रित कष्टाचे हे फळ आहे. असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
