कोल्हापूर:” कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली याचा मनस्वी आनंद आहे. परंतु, जागा कमी मिळाल्या याचे दुःखही होत आहे. जो एकटा लढतो त्याला निवडणुकीत सहानुभूती मिळत असते. त्यामुळेच कदाचित काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या असाव्यात. आम्ही महायुतीतून निवडणून आलो आहे. पाचही वर्षे युतीसोबतच राहणार आहोत. कोल्हापूरच्या जनतेला दिलेली आश्वासने आम्ही महायुतीच्या माध्यमातून पुर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू.असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
