इचलकरंजीत महायुतीची भव्य कॉर्नर सभा उत्साहात

कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. १२ मधील यशवंत कॉलनी येथे l महायुतीची भव्य कॉर्नर सभा उत्साहात संपन्न झाली.

राज्याचे मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ . राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला यशवंत कॉलनीतील नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती.

यावेळी बोलताना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, “इचलकरंजीचा कायापालट करण्यासाठी महायुतीचे सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करणाऱ्या हातांना बळ द्या.” मी आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीही गेल्या काही वर्षात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत भविष्यातील स्मार्ट सिटीचा संकल्प मांडला.

सभेचा वाढता उत्साह पाहून यशवंत कॉलनीतील जनसमुदायाने येणाऱ्या १५ जानेवारीला विकासाच्या पाठीशी उभे राहून महायुतीला भरघोस मतदान करण्याचा एकमुखी निर्धार केला.

🤙 8080365706