कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आ.सतेज पाटील उपस्थित राहीले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे उपस्थित होते.
सत्ता महायुतीची असली तरी शब्द पूर्ण करण्याच्या माध्यमातून आम्ही लोकचळवळ चपली आहे. याच विश्वासाच्या जोरावर आम्ही तुमच्या समोर आलो आहोत.आज आम्ही शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून शब्द देतो. राज्यात आणि केंद्रात सत्ता कोणाचीही असो इचलकरंजीच्या विकासासाठी सत्तेचे दार तोडून निधी आणू आणि इथला पाणीप्रश्न सोडवू असा विश्वास आ सतेज पाटील यांनी मतदारांना दिला.
संजय कांबळे, क्रांती आवळे, बाबुराव पानोरी, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, सचिन साठे, दिग्विजय शिंदे, प्रकाश बरकाळ, सावित्रीबाई हजारे, सतीश मगदूम, निवृत्ती शिरगुरे, राजन मोठाणे तसेच उमेदवार अब्राहम आवळे, संतोषी कांबळे, रोहिणी बरकाळे, राहुल खंजीरे यांच्यासह शिवशाहू आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
