भाजपच्या वतीने आजरा व चंदगड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

कोल्हापूर :लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने आजरा व चंदगड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

यावेळी उमेदवारांची कार्यक्षमता आणि जनसंपर्क पडताळून पाहण्यात आला. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व देण्याकरिता भाजप कटिबद्ध आहे. या मुलाखतीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला जाणार आहे त्यानंतर सक्षम उमेदवारांची घोषणा केली जाईल.

यावेळी खा . धनंजय महाडिक,महेश जाधव, नाथाजी पाटील उपस्थित होते.

🤙 8080365706