कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ मधील शहापूर येथील पूरग्रस्त वसाहत परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य ‘कॉर्नर सभा’ पार पडली. आ . राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला स्थानिक नागरिकांनी आणि तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
सभेत नागरिकांना संबोधित करताना म्हणालो की, “पूरग्रस्त वसाहतीतील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि या भागाला मुख्य प्रवाहातील नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रभाग १ मधून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी आ.राहुल आवाडे यांनी केले.”
या सभेमुळे प्रभाग १ मध्ये महायुतीच्या प्रचाराने गती घेतली असून, आगामी निवडणुकीत या सभेचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
