डॉ.दश्मिता सत्यजित जाधव यांनी अंबाई डिफेन्स परिसरात घरोघरी जाऊन केला प्रचार

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ
आज त्यांच्या पत्नी व जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी अंबाई डिफेन्स परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला.

प्रत्येक घरात थांबत, प्रत्येक कुटुंबाशी आपुलकीने संवाद साधत, नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना समजून घेत सत्यजित जाधव यांच्या विकासाभिमुख विचारांची माहिती त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवली.

या दरम्यान प्रचाराची पत्रके देत आगामी निवडणुकीत सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या विजयासाठी भरघोस मतांनी मतदान करण्याची आपुलकीची विनंती त्यांनी केली.

सेवाभाव, नम्रता आणि सकारात्मक संवाद यांच्या माध्यमातून केलेल्या या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अनेक नागरिकांनी “ सत्यजित चंद्रकांत जाधव यांचा विजय निश्चित आहे” अशी भावना व्यक्त केली.

🤙 8080365706