बाहुबलीचे बुद्धिबल आदीकुमार बेडगे यांचा चौथा स्मृतिदिन बाहुबली प्रशालेमध्ये संपन्न.

बाहुबली( प्रतिनिधी) ता. ४ एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, येथे चार सप्टेंबर रोजी बाहुबली विद्यापीठाचे माजी संचालक, स्वर्गीय बी.टी. बेडगे गुरुजी यांचा चौथा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे सहसचिव सुरेश चौगुले, सदस्य,बाहुबली विद्यापीठाचे तात्यासाहेब अथणे, सदस्य,बाहुबली विद्यापीठाचे रवींद्र खोत हे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण व फोटो पूजनाने करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक अध्यापिका वैशाली पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला.विद्यार्थी मनोगत
अन्वी कांबळे व संस्कार कोथळे यांनी केले.
अध्यापक मनोगतामध्ये नितीन मालगावे यांनी गुरुजींच्याबद्दल माहिती सांगताना,जुन्या आठवणींना उजाळा व त्यांची कौटुंबिक माहिती दिली. संस्थेने त्यांना कसे घडवले,याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे सहसचिव सुरेश चौगुले यांनी स्वर्गीय बेडगे गुरुजी यांच्याबद्दल माझ्या वैयक्तिक नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतच्या कालखंडातील दिवसांना उजाळा दिला.
शालेय स्तरावरील निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थी व अध्यापकांचा पुरस्कार वितरण संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभागप्रमुख रवींद्र देसाई, व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले, अध्यापक, अध्यापिका,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार विजय ककडे यांनी केले तर सूत्रसंचालन नीता पाटील व प्रदीप धोतरे यांनी केले.विनोद शिंगे कुंभोज

🤙 9921334545