कुंभोज परिसरात पोलिसांचा डॉल्बीवर अंमलबजावणीचा बडगा; १० नंतर डॉल्बी बंद केल्याने अनेक तरुण मंडळांचा हिरमोड, लाखो रुपयांचे नुकसान

कुंभोज प्रतिनिधी :-कुंभोज गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुंभोज परिसरात पोलिसांनी रात्री १० नंतर डॉल्बी साउंड सिस्टम थांबवण्याचे आदेश काटेकोरपणे लागू केल्याने अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचे नियोजन उधळले गेले. त्यामुळे अनेक तरुण मंडळांचा हिरमोड झाला असून, साऊंड सिस्टिमसाठी केलेल्या खर्चावर पाणी फिरले. काही मंडळांनी लाखो रुपये खर्च करून खास डीजे व डॉल्बी साउंड यंत्रणा आणली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर डॉल्बी साउंड वाजवण्यास बंदी आहे. या नियमाची अंमलबजावणी करत हातकणंगले पोलीस ठाण्याच्या पथकांनी ठिकठिकाणी मिरवणूक थांबवून डॉल्बी बंद करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी पोलिसांनी थेट साउंड सिस्टीम बंद केल्या, तर काही ठिकाणी मंडळांनी पोलिसांच्या सांगण्यावरून स्वतःच यंत्रणा बंद केल्या.या निर्णयामुळे अनेक मंडळांचे सुमारे ५० हजार ते १.५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते. काही मंडळांनी विशेष डीजे ट्रक बुक केले होते. “आम्ही महिनाभर मेहनत करून पैसे जमा केले आणि शेवटी रात्री १० वाजता सर्व थांबवावे लागले. संपूर्ण मिरवणुकीची मजा गेली,” अशी प्रतिक्रिया एका मंडळाच्या कार्यकर्त्याने दिली. यावेळी मसुदी चौकात बराच वेळ अनेट मिरवणुका एका ठिकाणी थांबून राहिल्याने अनेक मडळाना तोटा झाल्या असल्याचे मत गावातील अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले.विनोद शिंगे कुंभोज

🤙 9921334545