डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय…..आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार

कोल्हापूर :कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरवतीने आर्किटेक्चर (वास्तुकला) प्रवेश प्रक्रिया 2025-26 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 12 जुलै रोजी सकाळी 10 वाजता डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सभागृहात हा सेमिनार होणार आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या 41 वर्षांपासून गुणवत्तापूर्ण आर्किटेक्चर शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ओळखले जाते. स्वायत्त संस्थेचा दर्जा असलेले हे एकमेव आर्किटेक्चर महाविद्यालय आहे. शनिवारी होणाऱ्या या सेमिनारमध्ये आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर डॉ. गुप्ता सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

यामध्ये आर्किटेक्चर शिक्षणाची सद्यस्थिती, आर्किटेक्चरमधील भविष्यातील ट्रेंड, आर्किटेक्चर पदवीनंतरच्या करिअरच्या संधी, आरक्षण, नाटा 2025 च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर, राज्यातील टॉप कॉलेजचा कट ऑफ, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र अपलोड करताना घ्यायची काळजी, ऑप्शन फॉर्म भरणे, प्रवेश प्रक्रिया 2025-26 मधील महत्वाचे बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले जाणार आहे. हा सेमिनार पूर्णपणे मोफत असून आर्किटेक्चरमधील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी-पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, अॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी व आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रो. इंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

🤙 9921334545