विद्यार्थी आदानप्रदान उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान अधिविभागाचे तीन विद्यार्थी चीनला

कोल्हापूरभारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंध स्थापनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त चीन सरकारतर्फे भारतीय युवकांसाठी विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या तीन विद्यार्थ्यांची चीन दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २० जूनला हे विद्यार्थी चीनकडे रवाना होणार आहेत.

 

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातून चीन दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी- राधिका संदीप पाटील (प्रथम वर्ष, बी.टेक. फूड टेक्नॉलॉजी)ओम सचिन कोळेकर (तृतीय वर्ष, बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन) आणि मुकुंद गौतम गायकवाड (प्रथम वर्ष, एम.टेक. एनर्जी टेक्नॉलॉजी).

या विद्यार्थ्यांचा चीन दौरा २० जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत पार पडणार असून दौऱ्यादरम्यान त्यांना बीजिंगशिजियाझुआंग आणि शांघाय शहरांमध्ये सांस्कृतिकशैक्षणिकऐतिहासिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमामध्ये चिनी भाषा व संस्कृती वर्गयुवा संवाद मंचऐतिहासिक स्थळदर्शनसंग्रहालय भेटीचहा संस्कृती अनुभव आणि भारतीय दूतावास भेट अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा निवासभोजनदेशांतर्गत प्रवास आणि शैक्षणिक उपक्रमांचा संपूर्ण खर्च चीन सरकारतर्फे केला जाणार आहे.

या विशेष उपक्रमासाठी संधी प्राप्त झालेल्य़ा विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्केप्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले आहेविद्यार्थ्यांच्या निवडीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे समन्वयक डॉ. एस.बी. सादळेतंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर,  तंत्रज्ञान अधिविभागाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभाग समन्वयक डॉ. उदय पाटील यांनी परिश्रम घेतले.

🤙 9921334545