इंजिनीअरिंग प्रवेश २०२५-२०२६” विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन   संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा मोफत सेमिनार

कोल्हापूर : १२ वी (PCM) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वतीने इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ संदर्भातील  मोफत सेमिनार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. बुधवार दिनांक १८ जून २०२५ रोजी सकाळी १०:३०  वाजता, राजश्री शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे पैलू समजावून सांगण्यात येणार आहेत.

डॉ. विराट  गिरी, संचालक, संजय घोडावत इन्स्टिट्यूट हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  सेमिनारमध्ये विद्यार्थी व पालकांना मिळणारे महत्त्वाचे मार्गदर्शन सध्याच्या इंजिनीअरिंग शिक्षण आणि रोजगार क्षेत्राची स्थिती,  विविध शाखांची ओळख व त्यामध्ये उपलब्ध करिअर संधी,  “ब्रँच की कॉलेज?” या गोंधळाचा सुस्पष्ट निर्णय,  नामांकित महाविद्यालयांचे मागील वर्षांचे कट-ऑफ,  CAP (Centralized Admission Process) विषयी सविस्तर माहिती,  २०२५-२६ मध्ये लागू होणारे नवीन नियम आणि बदल,  शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रांची यादी व सीट मॅट्रिक्स,  थेट प्रश्नोत्तर सत्र  विद्यार्थी व पालकांच्या सर्व शंका तज्ज्ञांकडून दूर करण्यात येणार आहेत. ही माहिती विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असून, भविष्यातील योग्य शाखा आणि संस्थेची निवड करण्यात मदत होणार आहे.
१२ वी विज्ञान (PCM) गटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे.  विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी हे सेमिनार चुकवू नये. असे आव्हान इन्स्टिट्यूटच्या ऍडमिशन विभागाने केले आहे. नोंदणी मोफत असून जागा मर्यादित आहेत.
“इंजिनीअरिंग प्रवेश  विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन  संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

🤙 9921334545