आ.राहुल आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा

कोल्हापूर :इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ व खोतवाडी या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आ.राहुल आवाडे यांच्याअध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयात पार पडली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीकार्तिकेयन एस प्रमुख उपस्थित होते.
या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता तोनले साहेब, वनविभाग फॉरेस्ट ऑफिसर इंगवले साहेब, जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता काटकर साहेब, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता गोळे साहेब, हातकणंगले पंचायत समितीचे BDO मोकाशी मॅडम यांच्यासह सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545