कुंभोज (विनोद शिंगे)
एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथील सिद्धार्थ रवींद्र ऐनापुरे या विद्यार्थ्यांने नेत्रदीपक यश संपादन करत थेट आयआयटी (IIT) दिल्लीमध्ये एमटेक(M.Tech) ला प्रवेश मिळवला आहे.
या यशाने विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या विद्यार्थ्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण बाहुबली येथे,अकरावी, बारावी व बी.टेक(B.TECH) डीकेटीई(DKTE) इंचलकरंजी येथे
त्यानंतर गेट(GATE)परीक्षा क्वालिफाय होऊन आयआयटी(IIT) दिल्ली येथे एम.टेक(M.TECH) साठी त्याची निवड झाली आहे. यासाठी त्याचे त्याला मार्गदर्शन करणारे आई-वडील, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे बहुमोल असे सहकार्य त्याला लाभले. त्याचे सर्वच स्तरांतून कौतुकांचा वर्षाव होत आहे.