नवीन राजवाडा येथे हद्दवाढी संदर्भात बैठक

कोल्हापूर : नवीन राजवाडा येथे लोकप्रतिनिधी खासदार शाहू छत्रपती यांच्यासमवेत कोल्हापूर शहराच्या अनेक वर्ष प्रलंबित हद्दवाढी संदर्भात खासदार शाहू छत्रपती, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, आ. राजेश क्षीरसागर , दै.पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

 

यावेळी बैठकीत कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ अत्यावश्यक असून, सर्वांना विश्वासात घेऊन यासंबंधी .मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी प्रयत्न करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला..

🤙 9921334545