कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीमध्ये चालू, प्रस्तावित आणि इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी इचलकरंजी येथील रवींद्रनाथ टागोर वाचनालयासाठी २२ कोटी रुपयांच्या निधीस लवकरात लवकर मान्यता मिळावी, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी सहपालकमंत्र्यांकडे केली.
या बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा. राजेशजी क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.