गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नाविद मुश्रीफ यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा व्हावा यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. महायुतीचाच अध्यक्ष होण्यासाठी राज्यातील नेत्यांचा दबावही होता. नाविद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव शेवटच्या क्षणी महायुतीच्या नेत्यांच्या दबावाने मागे पडले. महायुतीकडून नाविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील व अजित नरके यांची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आली होती. अखेर नाविद मुश्रीफ यांच्या गळात अध्यक्षपदाची माळ पडली.

🤙 9921334545