गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नाविद मुश्रीफ यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नाविद मुश्रीफ यांच्या निवडीचा लखोटा राजश्री शाहू आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आबाजी यांना दिला. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 30) संचालक मंडळाची सभा गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात झाली.

अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव शेवटच्या क्षणी महायुतीच्या नेत्यांच्या दबावाने मागे पडले. महायुतीकडून नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील व अजित नरके यांची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आली होती. अखेर नाविद मुश्रीफ यांच्या गळात अध्यक्षपदाचीमाळ पडली.

‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार देत अरुण डोंगळे यांनी बंड पुकारल्यापासून ‘गोकुळ’ अध्यक्षपदाची निवड गाजत आहे. काही दिवसांतच डोंगळे यांचा राजीनामा घेण्यात ‘गोकुळ’च्या नेत्यांना यश आले. परंतु, अध्यक्ष महायुतीचा असावा, असे सांगून ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीत नेत्यांचीच त्यांनी अडचण केली. अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचाली सुरू झाल्या. यावेळी सतेज पाटील गटाकडे अध्यक्षपद होते. शशिकांत पाटील चुयेकर यांचे नावही निश्चित झाले होते; परंतु महायुतीचा अध्यक्ष करण्याबाबत मुश्रीफ यांच्यावर दबाव आल्याने नेत्यांना नाव निश्चित करण्यासाठी तातडीने गुरुवारी बैठक घ्यावी लागली. या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना श्रीप आमदार सतीश पाटील आमदार विनय गोरे आमदार चंद्रदीप नरके के पी पाटील संचिका घाटगे उपस्थित होते.

🤙 9921334545