पेठवडगाव येथे फळविक्रेत्याचे घर चोरट्यांनी फोडलं ; पावणलाखाचा ऐवज लंपास

पेठवडगाव : येथील भुमिनंदन काॅलनीतील फळविक्रेत्याचे बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयड्याने कुलूप तोडून अठ्ठावण्ण हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंधरा हजार असा पावणलाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी फिर्याद असीफ अस्लम आत्तार यांनी दिली.पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

 

घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार : येथील भुमिनंदन काॅलनीतील गल्ली नंबर चार येथे आत्तार राहतात. आत्तार यांच्या घरातील आई,बहीण,पत्नी मुलगा हे नातेवाईकांच्याकडे गेल्या होत्या.तर आत्तार हे बुधवारी सकाळी फळविक्रीसाठी इचलकरंजीला गेले होते. ते रात्री परत आले.मात्र दिगे काॅलनीतील मामाच्या घरी मुक्कामास राहिले. दुसऱ्या दिवशी आज गुरूवारी सकाळी घरी आले असता, चोरट्यांनी बंद दरवाजाचे कुलूप तोडले होते. घरातील साहित्य विस्कटले होते. तसेच लॉकर फोडून दोन अंगठ्या, चेन व रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.तपास हवालदार इंद्रजित शिंदे करीत आहेत.

🤙 9921334545