कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखाना कार्यस्थळावर कारखाना कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि लोटस मेडिकल फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कर्मचारी वर्गातून उदंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची रक्तदाब,मधुमेह, थायरॉईड, कॅन्सर, हिमोग्लोबिन आणि एचआयव्ही तपासणी करण्यात आली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मोफत धनुर्वात इंजेक्शन देण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, धीरज उलपे, कामगार कल्याण मंडळाचे अमित गायकवाड, चंद्रकांत घाटगे, दीपक गावराखे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.