कोल्हापूर : कुरुंदवाड येथील साधना मंडळाच्या सभागृहात नियोजित श्रीराम भटक्या विमुक्त जमाती सूत गिरणी मर्या.कुरुंदवाडच्या शेअर्स वितरण कार्यक्रमप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थीत राहीले.
यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने,माजी आमदार प्रकाश आवाडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर,जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे,माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे,दादासाहेब पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
“श्रीराम सूतगिरणी हा प्रकल्प केवळ एक औद्योगिक यंत्रणा नसून,तो जनतेच्या सहभागातून उभी राहणारी एक चळवळ आहे.रामचंद्र डांगे यांनी ‘आपलं गाव स्वयंपूर्ण व्हावं’या हेतूने ही गिरणी उभी केली आहे. त्यांच्या पारदर्शक आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळेच सामान्य शेअरधारकांनी विश्वासाने आपली गुंतवणूक केली आहे.असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
यावेळी शेअर्स खरेदी केलेल्या सभासदांना अधिकृत पावत्या वितरित करण्यात आले.यावेळी धनपाल पोमाजे,विठोबा कोळेकर,बाबासाहेब सावगावे,तेजस कोळेकर,पोपट पुजारी,महिपती बाबर,तुकाराम चिगरे,रणजित डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.