ओवी पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने मृत्यू

कुंभोज (विनोद शिंगे)
हातकणंगले येथील सागर पुजारी याची मुलगी ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. गेली सहा महिन्यांपासून ती या आजाराला झुंज देत होती. तिच्या मृत्यूने हातकणंगले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सहा महिन्यापूर्वी तिला फिट आली होती. गावातच उपचारानंतर वारंवार फिट येऊ लागल्याने तिला कोल्हापूर येथील खासगी उपचारासाठी दाखल केले. सर्व तपासण्या केल्यानंतर तिला दुर्मिळ इएसपीई विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले यावरती जगामध्ये कोणतेच ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे वडील सागर हातबल झाले. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. गुगल वर सर्च करून त्यांनी आजाराची माहिती घेतली आणि चीनमध्ये औषध उपलब्ध असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी थेट थायलंड घातलं आणि तेथून चीन मधून औषध घेऊन उपचार सुरू केली. काही प्रमाणात प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. परंतु हा दीर्घकालीन औषध उपचार असल्यामुळे यासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च येणार होता. ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली त्यांनी तातडीने सागर पुजारी यांना मंत्रालयात बोलवून घेऊन मदत दिली आणि उपचार सुरू ठेवण्यास सांगितले. गेली तिचेवर अस्टर आधार येथे उपचार सुरू होते रविवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडली आणि साडे चार वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.

🤙 9921334545