कोल्हापूर : मौजे न्यू वाडदे येथील ग्रामस्थांना स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेल्या प्रॉपर्टी कार्डचे वितरण आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. गेली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने मालकी हक्क प्राप्त झाले याचे मनस्वी समाधान आहे,असे मत आ. महाडिक यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले, तालुका अधीक्षक किरण माने यांच्यासह राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमृता पताडे, प्रल्हाद थोरवत यांच्यासह लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.