कोल्हापूर : कागल मध्ये जयसिंगराव पार्क येथे सैनिकांकरीता अमरज्योती स्मारक कंपाऊंड वॉल बांधकाम कामांचा, २००९ साली जयसिंगराव पार्क येथे लोकार्पण झालेले विजयमाला गार्डनचे १५ वर्षानंतर नुतनीकरण कामांचा, यशवंत किल्ला येथे बॅडमिंटन कोर्ट, मॅट बसवणे व अनुषंगिक कामांचा, चिंतामणी पार्क येथे ओपन जिम कामांचा, रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर ९९ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप इत्यादी १.१५ कोटी कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर, शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, असल्म मुजावर, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, बाबासो नाईक, सौरभ पाटील, विवेक लोटे, गणेश कांबळे, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे, रोहित पाटील, भगवान कांबळे, तुषार भास्कर, सुरज कामत, पंकज खलीफ, अमित पिष्टे, दिपक कांबळे, संदीप कांबळे, प्रकाश कांबळे, राहूल कांबळे, मेघराज वाघमारे, बाळू कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते
