आपटे वाचन मंदिराचे कार्य उल्लेखनीय -सभापती राम शिंदे

कुंभोज  ( विनोद शिंगे)
आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमाला (वर्ष – ५३) या गौरवशाली सांस्कृतिक उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना राहण्याचा सन्मान लाभला.यावेळी त्याच व्यासपीठावरून सामाजिक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनावरील अनेक मुद्द्यांवर ‘प्रकट मुलाखत’ देण्याची संधी मिळाली.

 

याप्रसंगी आमदार राहुल आवाडे, आपटे वाचन मंदिरच्या अध्यक्षा .सुषमाताई दातार, उपाध्यक्ष हर्षदाताई मराठे, कार्यवाह मायाताई कुलकर्णी, निवेदक स्वानंद कुलकर्णी यांच्यासह वाचनालयाचे आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच दशके सुरू असलेली ही व्याख्यानमाला ही केवळ परंपरा नव्हे, तर विचारशीलतेचा एक सामाजिक दीपस्तंभ आहे. अश्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजाला बौद्धिक पोषण, विचारांना दिशा आणि संवादाला संस्काराचे अधिष्ठान लाभण्यास नक्कीच मदत होईल.