जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘सहकार दरबार’

कोल्हापुर : जिल्ह्यातील पतसंस्था, सेवा संस्था आणि इतर सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि तक्रारींचे वेळेत निरसन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘सहकार दरबार’ आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देणार आहे.

लोकांच्या अडचणी, त्यांच्या सूचना, त्यांनी सांगितलेल्या उणिवा याबाबत विचार करून भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे सेवा द्या. दाखल अर्जांचे वेळेत आणि प्राधान्याने निरसन करा. आपण पुन्हा आलेल्या तक्रारींवरील उत्तरांसह त्यांच्याकडे जावू. धोरणात्मक विषय असतील तर राज्य शासनाकडे मांडू. भारतासारख्या कृषिप्रधान देशात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. शेतकरी, कारागीर, लघुउद्योजक, महिला बचतगट, सहकारी बँका, दूध संघ यांसारख्या विविध घटकांना संघटित करून आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती घडवून आणण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे.

या चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी आणि तिचा विकास समृद्ध दिशेने व्हावा, यासाठी सहकार दरबार एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. येत्या काळात राज्यस्तरावरही अशाच पद्धतीचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.
लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील, सभासदांचा सहभाग वाढेल व विश्वास निर्माण होईल. नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल. ग्रामीण व शेती आधारित अर्थव्यवस्थेला सामूहिक विकासाची दिशा मिळेल. सहकार चळवळ ही केवळ आर्थिक प्रगतीचे साधन नसून ती सामूहिक नेतृत्व, लोकशाही मूल्ये आणि समाजघटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. अशा चळवळीला सहकार दरबारासारख्या उपक्रमांमधून मिळणारे पाठबळ हे तिचे मुळ बळ आहे.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर ,सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अमल महाडिक, विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, प्रादेशिक सहसंचालक सहकारी संस्था कोल्हापूर गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम, कार्यालय अधीक्षक मिलींद ओतारी यांच्यासह सर्व जिल्हा तसेच तालुका सहकार कार्यालयाचे अधिकारी, अर्जदार उपस्थित होते.

🤙 9921334545