तरुणांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःची प्रगती साधावी : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेने अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नवउद्योजक बनवण्याचे काम कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करत आहे. अनेक कुटुंबे त्यामुळे आर्थिक सक्षम होऊन स्वबळावर उभी राहत आहेत. तरुणांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःची प्रगती साधावी.असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते केले.
यावेळी रोहित बळवंत पाटील – वाळवे खुर्द, रणजीत सिद्राम पाटील – म्हाकवे या लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेचे मंजुरी पत्र देण्यात आले.
तसेच ओबीसी महामंडळातर्फे गुलाब मौला शेख – करनूर यांनाही कर्ज मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच रमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, मळगे खुर्दचे श्रीकांत पाटील, रघुनाथ अस्वले, आदीप्रमुख उपस्थित होते