आ. अशोकराव मानेंच्या हस्ते बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत भांडी वाटप

कुंभोज (विनोद शिंगे)
साई मंगल कार्यालय अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत हातकणंगले विभागाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून नोंदणीकृत 1100 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच पुरवठा वाटप कार्यक्रम हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव मानेयांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राज शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहित बांगवडे, युवा नेते शोएब शेख,जैद मुजावर,स्विय सहायक सुहास राजमाने,बांधकाम कामगार प्रतिनिधी किरण माने, सुभाष लोखंडे, संतोष माळी,नितेश दिक्षांत, अभिजीत आवळे, संतोष
खरात,भैय्यासाहेब धनवडे,महेश कोळी,विजय हेगडे, यांसह बांधकाम कामगार व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज