महाराष्ट्र राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई सुरू

मुंबई महाराष्ट्र राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून पाकिस्तानी प्रवाशांची यादी प्राप्त केली असून त्यांना परत पाठवण्याची कारवाई युद्धपातीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून महाराष्ट्रात प्रत्येक पोलीस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात आहे जो कोणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले