आ. राहुल आवाडेंच्या हस्ते कोरोची येथील “आण्णाभाऊ साठे मातंग समाज मंदिर” इमारतीच्या स्लॅब कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : आमदार निधीतून मंजूर झालेल्या कोरोची येथील “आण्णाभाऊ साठे मातंग समाज मंदिर” इमारतीच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले.

या वेळी मातंग समाजाचे प्रमुख मान्यवर, समाजबांधव, महिला भगिनी, युवा वर्ग तसेच कोरोची गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील एकतेचा, सामंजस्याचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा प्रत्यय सर्वांना आला.
या उपक्रमामुळे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात झाले असून, यामध्ये स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.