कुंभोज येथे भिडसावणाऱ्या विविध प्रश्नासंदर्भात आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांना निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे)
कॉलेज युवक/युवती कामगार वर्ग व दूरगावी जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी 6 ते 6.30 या वेळेत इचलकरंजी बस सेवा सुरू करावी.कुंभोज मुक्काम बस गाडी गेली कित्येक वर्षे बंद आहे तरी ती मुक्कामी गाडी सुरू करावी.इचलकरंजी ते आष्टा”कुंभोज मार्गे जाणारी नव्याने बस सेवा सुरू करण्यात यावी.या प्रमुख मागणीसाठी इचलकरंजी आगार प्रमुख यांना फोन व पत्राद्वारे आमदार माने यांनी तात्काळ सुचना दिली.

 

तसेच हातकणंगले ते कुंभोज या मार्गावरील अरुंद रस्त्यामुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघाती घटना व दोन मोठी वाहन पास होताना होणारी कसरत पाहता हा रस्ता रुंदीकरण करावा या आमच्या मागणीमुळे तात्काळ या पावसाळी अधिवेशनात हा रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख मा.शिवाजी पाटील यांना सुचना दिल्या.

यावेळी चर्चा सत्रात युवा नेते आदित्य पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे अमोल गावडे व विनायक पोतदार आदी इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545