कुंभोज (विनोद शिंगे)
वारणानगर येथे जेऊर (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायत सदस्य निरंजन सरवदे यांच्या प्रयत्नातून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जेऊर गावातील १५ पात्र लाभार्थ्यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवाजी दाभोळकर,शिवाजी चिले,धनाजी पाटील,जयवंत खेतल,राजाराम माने,भिमराव पाटील,उत्तम महाडिक,हर्षवर्धन पाटील,अरुण साठे,विनोद साठे,भैरव गोसावी,दादासो माने,अतुल चौगुले यांच्यासह सर्व लाभार्थी महिला आदी मान्यवर उपस्थित होते.