तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांचे कुंभोज गावठाण वाढ प्लॉट संदर्भात तात्काळ अहवाल सादर करण्याचे कुंभोज मंडल अधिकाऱ्यांना आदेश

कुंभोज ( विनोद शिंगे)
कुंभोज मधील गोरगरिबांना जागा आहे पण राहायला नीट घर नाही. महाराष्ट्र शासन नाव लागत असलेमुळे शासकीय योजने पासून वंचीत राहावे लागत आहे. त्यामुळे आम्ही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ निवेदन दिले व त्वरित कलेक्टर बैठक लावून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

हातकणंगले तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची भेट घेऊन सविस्तर माहिती सांगितली व निवेदन दिले. त्यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कुंभोज मंडल अधिकाऱ्यांना दिले.. तहसीलदार यांचे कामकाज खूप चांगले आहे, त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत त्यामुळे त्यांचे शिष्टमंडळाने आभार मानले.

🤙 9921334545