कुंभोज (विनोद शिंगे)
औरवाड (ता. शिरोळ ) येथे लिडर सार्वजनिक वाचनालय औरवाड यांच्यावतीने हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार व यशस्वी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला .
यावेळी निमंत्रक व वाचनालयाचे अध्यक्ष अब्दुल रशीद पटेल, लोकनियुक्त सरपंच शफी पटेल, ज्येष्ठ नेते सर्हद पटेल,अफसर पटेल,राजू रावण, सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत गावडे, नरंदे सर, माजी सरपंच प्रशांत मंगसुळे, स्वीय सहायक सुहास राजमाने, धनंजय टारे, साहेब पाशा पटेल,रहुफ पटेल, आदी मान्यवर उपस्थित होते.