तंत्रज्ञान अधिविभागात ‘टेक्नोसिस २०२५’ राष्ट्रीय स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान अधिविभाग,DOT) टेक्नोसिस २०२५ या राष्ट्रस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटनासाठी रेमंड कॉटन इंडस्ट्रीचे वर्क्स हेड श्री. दीपककुमर गुप्ता, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. ए.बी .कोळेकर अध्यक्षस्थानी होते. दीपककुमार गुप्ता यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी ध्येय, ज्ञान व अथक परिश्रम ही यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहे, असे सांगितले.

शाश्वत विकासासाठी इंजिनिअरिंगचा उपयोग कसा करता येईल यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. ए.बी .कोळेकर यांनी शाश्वत विकास व त्या दृष्टीने तंत्रज्ञानाची वाटचाल असली पाहिजे, असे सांगितले. स्पर्धेचे समन्वयक श्रीपाल गायकवाड यांनी विविध महाविद्यालयाच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन,प्रोजेक्ट मॉडेल, क्विझ, IPL ऑक्शन, गेमिंग, फूड स्टॉल या स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरीबा पटेल,पायल पाटील या विद्यार्थ्यांनी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रज्ञा जगताप हिने केले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रा.डॉ. ए.बी .कोळेकर, रासायनिक अभियांत्रिकीचे सम्यन्वयक प्रा.डॉ.पी.डी.पाटील यांची उपस्थिती होती. विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहूणांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. डॉ.डी एम. नांगरे, डॉ.ए.बी. मडावी,डॉ. प्रशांत पाटील, वैशाली मोहिते, शितल देहनकर,निकिता दिंडे आणि रासायनिक अभियांत्रिकेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम
घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जगताप आणि प्रीती बोरगे या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन यश देसाई यांनी मानले.

🤙 8080365706