कुंभोज (विनोद शिंगे)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती व शाखा हातकणंगले यांच्यावतीने गुरुवर्य कै.भा.वा शिंपी गुरुजी आदर्श शिक्षण पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. या आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्युट संचालक विराट गिरी, गटशिक्षणाधिकारी पं.स हातकणंगले, राज्य नेते व सुकाणू नेते प्रा.शि.बँक ज्योतिराम पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, राज्य महिला आघाडी अध्यक्षा सौ. वर्षा केनवडे, जिल्हा नेते कृष्णात फरांडे राज्य आघाडी प्रमुख न.पा.म.न पा.सुधाकर सावंत, चेअरमन संचालक शिक्षण बँक राजेंद्र पाटील,को.जि.प.कर्म.सोसा. बाजीराव पाटील, व्हा. चेअरमन प्रा. शिक्षण बँक रामदास झेंडे, मार्गदर्शक नेते रवळू पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमलाकर,प्रा. शिक्षण बँक संचालक सुरेश कोळी,प्रा. बँक संचालक शिवाजी बोलके,प्रा. शिक्षण यासह शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .