मुंबई: मुंबईतील अभ्युदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वसन सदनिकांचे किमान चटई क्षेत्र 620 चौ. फूट निश्चित करून नव्या निविदा तातडीने काढण्याचे निर्देश दिले. याआधी 635 चौ. फूट क्षेत्रफळाच्या अटीमुळे निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता.


मुख्यमंत्री यांनी बैठकीत पुनर्विकास विनिमय 33(5) अंतर्गत अधिमूल्याचा एफएसआय गृहसाठा स्वरूपात देण्याचे निर्देश देत सध्या मिळणाऱ्या 20 हजार रुपयांच्या घरभाड्यात वाढ करण्याचा सकारात्मक विचार करण्याचे सांगितले. या निर्णयास अभ्युदय नगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनुकुलता दाखविली. आजच्या बैठकीतील निर्णय रहिवाशांसाठी दिलासा देणारा असून प्रकल्पास नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
यावेळी आमदार प्रविण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, मुख्य सचिव, म्हाडा उपाध्यक्ष आणि रहिवासी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.