लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक कर्ज योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप

कुंभोज (विनोद शिंगे)
वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजनेतंर्गत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना ३० हजार रुपये वैयक्तिक कर्ज योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच मीना पांडुरंग निकम-पोखले,आक्काताई बाबासो गायकवाड-पोखले,सुलभा विलास कांबळे-केखले,मनीषा संजय जाधव-वारणानगर,शबाना रमजान पठाण-पोखले,जयश्री लक्ष्मण पाटील-केखले या सर्व महिलांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी केडीसीसी बँकेचे पन्हाळा तालुका विभागीय अधिकारी उत्तम पाटील,केडीसीसी बँकेचे वारणानगर शाखेचे शाखाधिकारी अमर गाताडे,आर.टी.पाटील बाबासो गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते..