कोल्हापूर : विश्वनमोकार महामंत्र दिनानिमित्त जितो संस्थेच्या वतीने जगभरातील १०८ देशांमध्ये सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या ऐतिहासिक कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिले होते. त्यांनी नमोकार महामंत्राचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व संपूर्ण देशवासीयांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमात मुंबई येथून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या समवेत उपस्थिती दर्शवली आणि नमोकार मंत्राचा सामूहिक जप केला.हा कार्यक्रम धर्म, अध्यात्म व एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
यावेळी मंत्री मंडल प्रभात लोढा, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक डॉ. आचार्य लोकेश, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉ. भदंत राहुल बोधी महाथेरो, JITO चे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिमणलाल डांगी, तसेच उज्वल पगारिया, विशाल चोरडिया, नितीन खारा, प्रकाश धारिवाल आणि राजेश जैन सहभागी झाले होते.
