कोल्हापूर  महानगरपालिका अद्यावत फिश मार्केटची उभारणी करणार

कोल्हापूर  –  शहरातील नागरीकांना ताजी मत्स उत्पादने उपलब्ध होणे करीता केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनुदानातून  अद्यवात फिश मार्केट उभारणीचे नियोजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. शासनाच्या सहकार्यातून कोल्हापूर शहरातील जुन्या फिश मार्केटचे नुतनीकरण तसेच शहरातील उपनगरामंध्ये नविन फिश अद्यावत मार्केटसाठी आवश्यक कोल्ड स्टोरेजसह हे मार्केट उभारण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी जुने फिश मार्केट व राजोपाध्येनगर येथील भाजी मंडई लगतच्या जागेची आज पाहणी केली.

 

प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी यावेळी जुन्या फिश मार्केट मधील विक्रत्यांसोबत त्यांना येणाऱ्या अडीअडीचर्णी बाबत चर्चा केली. जुन्या फिश मार्केटचे नुतनीकरण करणे तसेच राजोपाध्येनगर स्थित भाजी मंडई लगतच्या जागेत अद्ययावत फिश मार्केट, कोल्ड स्टोरेज सुविधेसह, आवश्यक पार्किंगच्या उभारणे कामी तातडीने आराखडा करण्याचे निर्देश शहर अभियंता यांना दिले.
यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक संचालक नगररचना विनय झगडे, महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप सुर्वे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुदर्शन पावशे, उपशहर रचनाकार एन.एस पाटील उपस्थित होते.

🤙 9921334545