कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 मध्ये कार्यालयस्तरावर नागरीकांच्या तक्रारी सोडविण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. यासाठी प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उप-शहर अभियंता व संबंधीत कर्मचा-यांनी सोमवारी व मंगळवारी सकाळचे सत्रामध्ये उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय कार्यालयस्तरावर 9 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी तातडीने निर्गत करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
शहरातील नागरीकांना महापालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या सुविधेबाबत पाणी पुरवठा, मलनि:सारण, स्वच्छता, पथदिवे, रस्ते, सांडपाणी इत्यादीबाबत तक्रारी त्वरीत सोडविण्याठी प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदान अंतर्गत 2 तक्रारी, विभागीय कार्यालय क्र.3 राजारामपुरी जगदाळे हॉल अंतर्गत 1 तक्रारी, विभागीय कार्यालय क्र.4 छ.ताराराणी मार्केट अंतर्गत 6 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सांडपाणी निर्गत अडथळा, रस्त्यावर अतिक्रमण, बेकादेशीर कंपौंड, रस्तेचे रिस्टोलेशन, डांबरीकरण, स्पीडब्रेकर, आरोग्य सुविधा याबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. सदरच्या तक्रारीमधील काही तक्रारी आजच निर्गत करण्यात आल्या असून उर्वरी तक्रारीवर पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
तरी विभागीय कार्यालय स्तरावरील प्रभागातील नागरीकांनी प्रत्येक आठवड्यात सोमवारी व मंगळवारी आपल्या तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.