महावीर जयंती दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

कोल्हापूर  : भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरवारी, दि. 10 एप्रिल 2025 रोजी शासन आदेशानुसार सदरचा दिवस अहिंसेच्या मार्गाने साजरा होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

 

 

तरी कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी याची नोंद घेवून त्यांची दुकाने बंद ठेवणेची आहेत. यामध्ये कसुरी झालेस संबधीत दुकान मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.