एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली. एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये ३३ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कुंभोज  (विनोद शिंगे)
बाहुबली येथील एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबलीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.यामध्ये एन.एम.एम.एस‌. शिष्यवृत्तीधारक १७ व सारथी शिष्यवृत्तीधारक १६ असे एकूण ३३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली.

 

 

यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील व इतर सन्माननीय सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्यद्यापक अनिल हिंगलजे,पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभागप्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एन.एम.एम.एस. विभागप्रमुख दादासो सरडे, स्मिता निटवे,वैशाली लठ्ठे व श्रुतिका चोपडे यांचेही मार्गदर्शन लाभले.

🤙 9921334545