मंत्री हसन मुश्रीफांच्यावर रमजान ईदच्या शुभेच्छाचा वर्षाव

कोल्हापूर : दरवर्षी रमजान ईदला कागल, गडहिंग्लज व उत्तूर या विधानसभा मतदारसंघातून तसेच कोल्हापूर शहरासह सबंध जिल्ह्यांमधून जनता मंत्री हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी कागलला त्यांच्या निवासस्थानी येत असते.

 

 

मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्या मतदार संघातील व जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे, कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक युवराज पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, बिद्री कारखान्याचे संचालक व उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, प्रांताधिकारी श्री चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, प्राध्यापक जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शितलताई फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, कोल्हापूर शहरातील उबाठा गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पन्हाळा तालुकाध्यक्ष संतोष धुमाळ, माजी सभापती जयदीप पवार, भूषण पाटील, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन जीवनराव शिंदे, विष्णूपंत केसरकर, पत्रकार अतुल जोशी, सुरेश पाटील यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.