नागपूर : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागपूरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य सेवांचे सध्या सुरू असलेले उपक्रम,
सरकारी रुग्णालयांची स्थिती, औषध-पुरवठा, तसेच विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यात आला. त्यांनी आरोग्य सुविधांच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुधारणा सुचवल्या आणि लोकाभिमुख होण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.