आ. राहुल आवाडे यांनी शहापूर येथे श्री म्हसोबा मंदिर ते गावठाण रस्त्याच्या कामाची केली पाहणी

कोल्हापूर : शहापूर येथील श्री म्हसोबा मंदिर ते शहापूर गावठाण रस्त्याचे काम माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडेआम.राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना रस्ता अधिक रुंद करण्याच्या सूचनाही त्यांनीं दिल्या.

 

 

 

पाहणी दरम्यान त्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करत नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या कामामुळे नागरिकांना प्रवासासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार असून, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी विकासकामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचा आग्रह धरला आणि लोकांच्या सोयीसाठी कोणतीही तडजोड होणार नाही, असे स्पष्ट केले.

🤙 9921334545