शाहू’ची मानधनधारक शुक्ला बिडकरला राष्ट्रीय पॕरा पावरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

कागल : दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय पॕरा पाॕवरलिफ्टिंग स्पर्धेत शाहू साखर कारखान्याची मानधनधारक खेळाडू शुक्ला बिडकरने एक्केचाळीस किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले.

शुक्लाने पन्नास किलो वजन उचलून सलग दुसऱ्या स्पर्धेत पदक पटकावून कोल्हापूरचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. कोल्हापुरात बिभीषण पाटील यांच्या व्यायाम शाळेत सारिका सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे. बिभीषण पाटील यांच्यासह शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे तिला प्रोत्साहन मिळाले.