शिवाजी विद्यापीठात बुधवारी महाराष्ट्र अर्थसंकल्पावर परिसंवाद

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागातर्फे (स्वायत्त) येत्या बुधवारी (दि. २६) ‘महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५-२६’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी १० वाजता अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार सभागृहात परिसंवादाचे उद्घाटन होईल. परिसंवादात विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. ज्ञानदेव तळुले, वाणिज्य अधिविभागाचे डॉ. केदार मारुलकर, ज्येष्ठ पत्रकार-संपादक डॉ. श्रीराम पवार, आयसीएआय, कोल्हापूरचे चेअरमन नितीन हरगुडे, सीआयआय दक्षिण महाराष्ट्र विभागाचे चेअरमन सारंग जाधव आणि डॉ. सुभाष कोंबडे सहभागी होतील. वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश कांबळे अध्यक्षस्थानी असतील.

🤙 9921334545