महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदरातील तफावत दुर करण्यासाठी PCPNDT कायद्याची प्रभावी अभंलबजावणी करण्यात यावी : मंत्री आबिटकर

नागपूर: नागपूर दौऱ्यावर असताना आरोग्य विभागातील उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत मंत्री प्रकाश आबिटकर नागपूर विभागीय आढावा बैठक घेतली.

 

 

 

यावेळी रोजंदारी कामगाराचे वेतनाचे प्रश्न, वर्ग 1 ते 4 असलेले कत्रांटी कर्मचारी यांचे प्रश्न, गडचिरोली व चंद्रपुर जिल्हयातील हिवताप, डेंग्यु,सिकलसेल, क्षयरोग ऊपाययोजना, कुष्ठरोग, अंडवृधदी शस्त्रक्रिया, 108ॲम्बुलन्स, 102 ॲम्बुलन्स आदीचा आढावा घेतला.

महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदरातील तफावत दुर करण्यासाठी PCPNDT कायद्याची प्रभावी अभंलबजावणी करण्यात यावी, खाजगी सोनोग्राफी सेंटरची नियमीत तपासणी करण्यात यावी, गर्भपात केंद्राची नियमित तपासणी करावी, बोगस डॉक्टर असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे डॉक्टर आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी अशा सुचना केल्या.

बॉम्बे नर्सिंग ॲक्ट नुसार खाजगी रूग्णालयांना नियमाप्रमाणे मान्यता द्यावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधे जास्तीत-जास्त खाजगी रूग्णालयाचे समावेश करावा, जनतेला त्याचा लाभ मिळून द्यावा, प्रत्येक नागरीकांचे आभा कार्ड काढण्यात यावीत, आरोग्य संस्थांची होत असलेली बाधंकामे व दुरूस्ती सर्व नियमांचे पालन करून दर्जेदार करण्यात यावीत, जनतेला सर्व शासकीय संस्थेत दर्जेदार आरोग्य सेवा तसेच औषधी पुरवण्यात याव्यात, औषधीचा साठा दैनंदिन ऑनलाईन‌ पोर्टलवर नोंदविण्यात यावा, माता मृत्यू-बाल मृत्यु,अर्भक मृत्यु कमी करण्याबाबत ऊपाययोजना कराव्यात, माता व बालकांना योग्य पोषण मिळेल, कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी कयण्याबाबत सर्वेतपरी प्रयत्न करणे, सर्व गरजेनुसार संदर्भ सेवा देण्यात यावीत तसेच सांसर्गीक व असांसर्गीक आजाराचे प्रमाण कशा पध्दतीने कमी करता येतील व जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्या बाबत सुचना दिल्या.

यावेळी राज्यमंत्री ॲड.आषिशजी जैस्वाल, आरोग्य उपसंचालक डॉ.शिशीकांत शंभरकर, ऊपसंचालक आरोग्य सेवा नागपूर डॉ.अजय डवले, संचालक सार्वजनिक आरोग्य संस्था महाराष्ट्र राज्य डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निवृत्ती राठोड यांच्यासह जिल्हा शल्य चिकीत्सक तसेच चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, भंडारा जिल्हायातील अधिकारी उपस्थित होते.