डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते हुपरी येथील आशा धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

कुंभोज (विनोद शिंगे)
हुपरी येथील आशा धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर( संचालक – गोकुळ दूध संघ,कोल्हापूर) व डॉ.अभिजित कोगनोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या हॉस्पिटलच्या माध्यमातून हुपरी परिसरातील लोकांना चांगली रुग्णसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.जंगले व त्यांच्या टिमचे अभिनंदन केले.

 

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, सरपंच संगीता नरंदे, मा.नगरसेविका लक्ष्मी साळुंखे, युवा सेना शहराध्यक्ष अजित उगळे, सागर पाटील, संभाजी हांडे,किशोर निकम,संजय लोहार, राजेंद्र साळुंखे, डॉ.कापाले, डॉ.मुरचिट्टे, डॉ.निगडे,डॉ जंगले परिवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545